file photo

पुणेःमाजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ओळख झालेल्या वर्गमैत्रिणीवर बलात्कार करून, त्याचा व्हिडिओ जुन्या शाळकरी मित्रांच्या ग्रुपवर पाठवणा-याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

गुन्हा दाखल होताच आवळल्या मुसक्या

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश असुलाल डांगी, वय ४१ वर्षे, राहणार शिल्पतारा सोसायटी, आंबेगाव पठार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

Advertisement

पीडितेची बदनामी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि डांगी यांनी एकाच शाळेत शिक्षण घेतले आहेत. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात त्यांची पुन्हा ओळख झाली. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक व्हॉटसअप ग्रुपही केला होता.

या माध्यमातून त्याने पुन्हा पीडित महिलेशी ओळख वाढवली. ओळख वाढल्यानंतर त्याने पीडित महिला राहत असलेल्या ठिकाणी जाऊन जबरदस्तीने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.

या संबंधाचे व्हिडीओ रेकॉर्डीग करुन ते शाळेच्या ग्रुपवर पाठवले. यामुळे पीडितीचे मित्र परिवारात मोठी बदनामी झाली.

Advertisement

गुंगारा देत असतानाच चतुर्भुज

पोलिस शिपाई प्रदीप जिजाबा बेडिस्कर यांनी तांत्रिक विश्लेषण केले; मात्र आरोपीने आपला मोबाईल बंद करून पोलिसांना गुंगारा देत असतानाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला चोवीस तासात अटक करण्यात आली.

आरोपी हा सेव्हन लव्हज चौकात असलेल्या एका कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्हचे काम करतो.

Advertisement