मुंबई – साऊथ सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेता विक्रम (Vikram) यांची तब्येत बिघडल्याने (Hospitalized) त्यांना काल चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, विक्रम (Vikram) यांची तब्येत का बिघडली आणि त्यांना रुग्णालयात (Hospitalized) का आणावे लागले याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

विक्रम त्याच्या आगामी ‘पोनियिन सेल्वन’चा टीझर रिलीज करणार होता पण त्याआधी त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. विक्रमला हृदयविकाराचा (heart attack) झटका आला होता, त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात (Hospitalized) दाखल करावे लागले.

हा अभिनेता विक्रम मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन या बिग बजेट चित्रपटाचा एक भाग आहे. ज्याचा टीझर सर्व भाषांमध्ये रिलीज होणार आहे.

या टीझर रिलीजच्या वेळी विक्रमलाही उपस्थित राहावे लागले होते, पण त्याआधीच त्यांची प्रकृती (heart attack) खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तेथे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, चाहतेही त्याच्या लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा देत आहेत.

अनेक चित्रपट रिलीजच्या रांगेत…

अभिनेता विक्रमचे अनेक चित्रपट येत्या काही दिवसांत प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहेत. त्याचा कोब्रा 11 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

पोन्नियिन सेल्वनबद्दल सांगायचे तर हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे, ज्याचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे.

या चित्रपटात ऐश्वर्या राय, कार्ती, जयम रवी, सरथ कुमार आणि त्रिशा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटावर बराच पैसा खर्च करण्यात आला आहे.