पुणे – सिनेमासृष्टीतील प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती चिंताजनक असली तरी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत, असे दीनानाथ मंगेशकर (dinanath hospital) हॉस्पिटलतर्फे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. गोखले यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टरांचे बारकाईने लक्ष आहे. प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टरांचे अथक प्रयत्न सुरू आहेत, असे रुग्णालय प्रशासनाने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांपासून व्हेंटिलेटरवर असलेले विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. बुधवारी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर (dinanath hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांचे मेडिकल बुलेटिन जारी करण्यात येणार आहे.

‘डॉक्टरांच्या उपचारांना ते म्हणावा तसा प्रतिसाद देत नाहीयेत. त्यांचे अवयव निकामी झाले आहेत. बुधवारी कोमात गेल्यापासून ते स्पर्शाला प्रतिसाद देत नाहीयत. त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवू नका,’ अशी विनंती दामलेंनी केली

तसेच, यावेळी त्यांच्या निधनाच्या देखील खोट्या बातम्या अनेक माध्यमांवर प्रसारित करण्यात आल्या मुळे त्यांच्या कुटुंबीयांनी यावर आपले मत मांडले आहे.

सध्या “विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. सध्या ते हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

दरम्यान, विक्रम गोखले यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड, मराठी सिमेमांना अनेका भूमिका गाजवल्या आहेत. अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे.

सिनेमांमध्ये मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय त्यांनी आजवर दिला आहे. त्याचा मोठा चाहता वर्गही आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला आहे.