पुणे – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती (accident) निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात (accident) झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. असं देखील सांगितलं जात आहे.

मात्र, नंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती.

दरम्यान उपचारादरम्यान मेटे (Vinayak Mete) यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. या घटने नंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा देखील मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.

अपघातानंतर नेमकं काय घडलं, याची माहिती कार चालकानं दिली आहे. चालक एकनाथ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार तासभर कुणीच मदत केली नाही, असं समोर आलं आहे.

त्यामुळे जर वेळीच विनायक मेटे यांना उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचू शकला असता, असाही तर्क लढवला जातोय.

चालक एकनाथ कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांना अपघातानंतर तासभर मदत मिळू शकली नाही. अनेक गाड्या थांबवून मदत मागण्यासाठी प्रयत्न कऱण्यात आले. पण एकानेही गाडी थांबवून मदत नाही केली,

असं एकनाथ कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. दरम्यान, एका छोटाशा टेम्पो चालकाने विनायक मेटे यांच्या अपघातग्रस्त वाहनाला पाहून गाडी थांबवली आणि मदत केली, असं त्यांनी सांगितलं.