मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती (accident) निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात (accident) झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. असं देखील सांगितलं जात आहे.

मात्र, नंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती.

दरम्यान उपचारादरम्यान मेटे (Vinayak Mete) यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. या घटने नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार काय म्हणाले…

“सकाळी उठवल्यानंतर पहिलीच बातमी मेटेंच्या निधनाची ऐकायला मिळाली. धक्का बसला, मेटे यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. गेली अनेक वर्ष विनायक मेटे यांनी महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी केली.

ते मराठा आरक्षण प्रश्नावर कायम आवाज उठवायचे. मेटे यांनी मराठा समाजासाठी उल्लेखनीय काम केले. ते सामाजिक प्रश्नाची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असत.

त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे, शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या निधनाने राज्यभरात हळहळ व्यक्त होत आहे.

अनेक राजकीय नेत्यांनी विनायक मेटे यांच्या निधनावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, हळहळ देखील व्यक्त केली आहे.