मुंबई- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या कार अपघातप्रकरणी ( Accident Death News) तीन महिन्यांनंतर मोठी कारवाई करण्यात आलीय. विनायक मेटे यांच्या कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीआयडीने (CID) हा गुन्हा दाखल केला आहे. रसायनी पोलीस स्थानकात विनायक मेटे यांचे कार चालक एकनाथ कदम (Eknath Kadam) यांच्या गुन्हा दाखल केलाय.

कार चालक एकनाथ कदम (Eknath Kadam) यांच्यावर राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा (Crime) दाखल केला आहे. लवकरच त्यांना ताब्यात घेतलं जाणार आहे.

रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालक एकनाथ कदम याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता.

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या या अपघातात विनायक मेटे यांना जबर मार बसून त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते.

लेन कटिंग आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात विनायक मेटे यांच्या कारचा अपघात झाला होता. ड्रायव्हरचं ओव्हरटेकिंग करताना जजमेन्ट चुकल्यानं हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात (accident) झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती.

मात्र, नंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान मेटे (Vinayak Mete) यांचं निधन झालं.

दरम्यान, विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सामाजिक चळवळीतील अनेकांना त्यांच्या या निधनामुळे धक्का बसला. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरीन अपघातांचा प्रश्नही ऐरणीवर आला होता.