मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं रविवारी पहाटे अपघाती (accident) निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात (accident) झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. असं देखील सांगितलं जात आहे.

मात्र, नंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान मेटे (Vinayak Mete) यांचं निधन झालं.

दरम्यान, विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सामाजिक चळवळीतील अनेकांना त्यांच्या या निधनामुळे धक्का बसला आहे. त्यांच्या अपघातानंतर अनेक नवीन खुलासे समोर येत आहे.

त्यांच्या कुटुंबीयानाही प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. विनायक मेटे यांच्या अपघाताला वेगळे वळण लागलं आहे. त्यामुळे संशयाचे ढग अधिकच दाट होत असल्याचा चित्र निर्माण झालं आहे.

मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या आरोपानंतर मेटे यांचे दुसरे चालक समाधान वाघमारे यांनी मोठा खुलासा केला आहे. ‘शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल”.

अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे (samadhan waghmare) यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्य़ंत आहेत, याबाबत अनेक शंका व्यक्त होत आहेत.

समाधान वाघमारे नक्की काय म्हणाले…

“जर त्या दिवशी मी गाडीवर असतो तर, मी स्वतःचा जीव दिला असता. मात्र, साहेबांना काहीही होऊ दिलं नसतं. मला वाटतं शिक्रापूरच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर यामध्ये बरंच काही मिळू शकतं,”

विनायक मेटे यांच्याकडे समाधान वाघमारे (samadhan waghmare) हे चालक म्हणून काम करत होते. मात्र ,14 तारखेला त्यांच्या वडिलांचे वर्षश्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते.

3 ऑगस्ट रोजी आम्ही गडबडीत मुंबईच्या दिशेने जात होतो. या दरम्यान शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. या दरम्यान मी मेटे साहेबांना म्हणालो गाडी थांबवू का?

मात्र साहेब म्हणाले ते दारू प्यायले असतील, त्यामुळे तू थांबू नकोस. यावेळी आमची गाडी फक्त 80च्या स्पीडवर होती. तर गाडीमध्ये मी, मेटे साहेब, बॉडीगार्ड ढोबळे आणि कार्यकर्ता अण्णा मायकर होता.” असं ते म्हणाले.