मुंबई – शिंदे-ठाकरे गटातील आगपाखड काही आता नवीन नाही. शिंदे गटात गेलेले सर्व शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार असून त्यांच्याविरोधात शक्य तेवढ्या पद्धतीने टीका ठाकरे गटातील नेत्यांकडून होत आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल..’ या डायलॉगमुळे प्रसिद्ध झालेल्या शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत जोरदार टोला लगावला आहे.

खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना नौटंकी करणारा माणूस म्हणून टोला लगावला आहे.

सांगोल्यातून शाहजीबापूंना येत्या निवडणुकीत मात देण्यासाठी ठाकरेंनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना उभे करण्याचा निर्णय घेतला असून लक्ष्मण हाके देखील शिवसैनिक तयार करण्याच्या कामाला लागले आहेत.

विनायक राऊत नेमकं काय? म्हणाले…

“शहाजीबापू यांच्यासारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात फक्त विनोद करु शकतो. पण एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करु शकत नाही. ही बाब सांगोला मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आली आहे.

त्यामुळे तिथली लहान मुलं, विद्यार्थीही, ‘शहाजीबापू इज नॉट ओक्के, शिवसेनाच ओक्के’, असे म्हणत असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी दिली.

दरम्यान, महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, या राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सतत आगपाखड होताना आपल्याला दिसून येत आहे.