कोरेगाव भीमा हिंसाचार (Koregaon Bhima Violence) प्रकरणी विश्वास नांगरे पाटलांची (Vishwas Nangre Patil) आयोगाकडून चौकशी होणार असून आयोगाचे वकील आशिष सातपुते(Ashish Satpute) यांनी या संदर्भात अर्ज केला होता.

कोरेगाव भीमामध्ये 2018 साली हिंसाचार प्रकरण झाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे. मात्र आता कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil)यांचीही चौकशी करण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांची साक्ष महत्त्वाची असणार असून आयोग त्यांची यासंदर्भात विचारपूस करणार आहे.

Advertisement

या हिंसाचार प्रकरणी नुकतेच आयपीएस अधिकारी परमबीर सिंग, रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आली आहे. आयोगाचे वकील आशिष सातपुते(Ashish Satpute) यांनी या संदर्भात अर्ज केला होता.

जेव्हा कोरेगाव-भीमाची घटना घडली, तेव्हा विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून कार्यरत असून ते परमबीर सिंग कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते.

त्यामुळे त्यांच्याकडे हिंसाचाराबाबतची गोपनीय माहिती तसेच इतर कागदपत्रे सादर केलेली होती. त्यामुळे त्यांची साक्ष महत्वाची ठरणार आहे.

Advertisement