गेल्या आठवड्यात बंडातात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ कराडला बंदी मोडून मोर्चा काढल्याचा गुन्हा दाखल असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे वादग्रस्त आणि चिथावणीखोर वक्तव्ये थांबवायला तयार नाहीत. आता तर त्यांनी वारक-यांनाच रस्त्यावर उतरून मंदिराची कुलुपे तोडण्याची चिथावणी दिली आहे.

कोरोना हे थोतांड

संभाजी भिडे यांनी कोरोनाबाबत केलेलं हे वक्तव्य पहिलंच नाही. त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा कोरोना थोतांड असल्याचं म्हटलं आहे.

आताही सांगलीत बोलताना त्यांनी, “कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही; मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे”, अशी टीका केली आहे.

Advertisement

पंढरपूरच्या वारीवर घातलेल्या बंदीला वारक-यांनी विरोध करून रस्त्यावर उतरायला हवं होतं, असं त्यांनी नमूद केलं.

पुढारी लोक काय लायकीचे ?

भिडे यांनी देशात आणि राज्यातील कोरोना परिस्थितीवरुन शंका उपस्थित केली आहे. महाराष्ट्रात आज भगवंतांचे नामकरण करत वारीला जाण्यासाठी बंदी घालण्यात आली.

कारण काय तर वारीमुळे कोरोन वाढू शकतो; मात्र कोरोना म्हणजे थोतांड आहे. निव्वळ थोतांड आहे, कोरोना वगैरे काही नाही. टाळेबंदीमुळे वाटोळं झालं.

Advertisement

सरकारचा अत्यंत चुकीचा निर्णय, पुढारी लोक काय लायकीचे आहेत ते माहिती आहे. एकजात सर्वजण स्वार्थी आहेत असं भिडे म्हणाले.

वारी झाली असती तर कोरोना दिसला नसता

कोरोनामुळे आज देशात काय घडलं असेल,तर लोकांमध्ये फक्त भीतीचं आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या वारीला जर बंदी घातली नसती, तर देशात एकही उदाहरण मिळालं नसतं, की कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. माझं मत आहे की, कोरोना हे षडयंत्र आहे. देशाचे हे दुर्दैव आहे, असं ते म्हणाले.

Advertisement