पुण्याच्या चोहोबाहूला दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे नद्यांचे पाणी वाढले आहे. डेक्कन येथील भिडे पुलाजवळ मुठा नदीतून वाहून आलेली जलपर्णी मोठ्या प्रमाणात अडकली होती. तशीच परिस्थिती मुळा-रामनदीच्या संगमाजवळ झाली.

पाषाण तलावातील जलपर्णी आणि पाणवनस्पतीदेखील या जलाशयामध्ये वाहून आली. या नव्या अडथळ्यांमुळे तेथील पाणी प्रवाही न होता त्याच भागांत साठले.

संगमाजवळ पातळी वाढली

दोन दिवस झालेल्या पावसामुळे रामनदी आणि मुळानदी संगमाजवळ पाण्याच्या पातळीत धक्कादायक वाढ झाली आहे. वेगवेगळ्या जलस्रोतांमधून वाहून आलेली जलपर्णी आणि राडारोडा काढून प्रवाहातील सर्व अडथळे तातडीने दूर करावेत, अशी मागणी बाणेर, पाषाण, औंध भागांतील नागरिकांनी केली आहे.

Advertisement

वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता

पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास रामनदी, मुठा नदीतील पाण्याची पातळी वाढून लगतच्या सोसायट्या, विधाते वस्तीसह इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे; तसेच या पाण्याचा रामनदीच्या बाजूला फुगवटा तयार झाल्यास हे पाणी उलट दिशेने वाट मिळेत तिथे पसरून धोकायदायक घटना घडू शकते, त्यामुळे प्रशासनाने तातडीने हालचाल करावी, अशी मागणी रामनदी संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांनी आणि नागरिकांनी केली आहे.

अडथळे दूर कर ण्याची मागणी

रामनदी पुनरुज्जीवन अभियान बैठकीतील चर्चेनुसार आम्ही फेब्रुवारी महिन्यातच आमदार चंद्रकात पाटील यांना रामनदीच्या प्रवाहातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निवेदन दिले होते.

महापालिकेलाही वेळोवेळी या समस्यांची माहिती दिली आहे. दोन दिवस झालेल्या पावसात नदीची पातळी अचानक वाढली असून अनैसर्गिक अडथळ्यांमुळे औंध, बाणेर, पाषाण भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.

Advertisement