लोणावळा – लोणावळ्यात (lonavala) पावसाची (rain) तुफान बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे लोणावळा खंडाळा परिसरात नैसर्गिक धबधबे (waterfall) वाहू लागलेत. पर्यटकांचे (tourists) नंदनवन असलेल्या पर्यटननगरीत पर्यटकांची मांदियाळी (lonavala rain updates) पहावयास मिळाली.

सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून लाखो पर्यटक लोणावळ्यात (lonavala) दाखल झाले असून, वर्षाविहाराचा आनंद लुटताना दिसत आहे.

महत्वाचं म्हणजे पर्यटकांच आवडत आणि आकर्षण असलेलं भुशी धरण (भुशी डॅम) होय, याठिकाणी आता पर्यटकांची गर्दी झाली आहे.

परंतु ज्या भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याच्या आनंद पर्यटक घेतात, त्या पायऱ्यांची दुरावस्था झाली आहे.

पायऱ्यांवरील दगड निखळले आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन पायऱ्या दुरुस्ती करणं आवश्यक आहे अन्यथा दुर्घटना घडू शकते.

तसेच, नागरिकांनी देखील या काळजी घेऊन आपला आनंद साजरा करावा असं स्थानिक नागरिक सांगत (lonavala) आहेत.

कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्षे पर्यटन बंद असल्याने नागरिकांचा हिरमोड झाला होता. परंतु यंदा पर्यटनाला चालना मिळाल्याने आणि पावसाची साथ असल्याने पर्यटनाच्या नगरीत नागरिक निसर्गाचा आनंद घेऊ लागले आहेत.

दरम्यान लोणावळा शहर पोलीसांची करडी नजर या पर्यटकांवर असणार आहे. तीन ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहे.

मुंबईवरून येताना खंडाळा येथे एक चेक पोस्ट तर पुण्यावरून येताना कुमार चौकात दुसरी चेक पोस्ट असेल. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.