इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या मुद्यावर आज सत्ताधारी आणि विरोधक रस्त्यावर उतरले. परस्परांना लाखोल्या वाहिल्या.

या पार्श्वभूमीवर ओबींच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमेकांकडे बोट दाखविण्यापेक्षा एकत्र येऊन लढण्याचा सूर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आळवला.

लोणावळ्यात चिंतन बैठक

लोणावळ्यात ओबीसी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आह. या बैठकीला मंत्री वडेट्टीवार, छगन भुजबळ उपस्थित होते. या वेळी ते बोलत होते. वड्डेटीवार म्हणाले, या परिस्थितीत एकमेकांकडे बोटं दाखवून मार्ग निघणार नाही.

Advertisement

त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. तरच आरक्षणाचा किंवा किंवा इतर मार्गी लागणे शक्य आहे. सर्वच राजकीय पक्ष आंदोलन हे ताकद वाढण्यासाठी करतात; पण कुठल्याही सामाजिक संघटनांचे आंदोलन हे समाजासाठी असतात.

त्यामध्ये विश्वासार्हता असते. सर्वच राजकीय नेत्यांनी पक्षाच्या पलिकडे जाऊन हा विषय चर्चेला आणणे आवश्यक आहे.

आंदोलनाचा राजकीय अर्थ

आम्ही कितीही आंदोलने केली; पण त्यातून वडेट्टीवार काँग्रेसची भूमिका मांडतात हाच अर्थ काढला जाईल. तसेच भाजपने आंदोलने केली तर ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात आहे, हेच समजले जाणार आहे असे मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

Advertisement

निवडणुकीत तुझी जात कंची ?

पाच वर्षे छगन भुजबळ चांगला असतो, कामं करतो; पण निवडणूक आली का तुझी जात कंची? असा प्रश्न विचारला जातो असे सांगत भुजबळ म्हणाले, की ओबीसींमध्ये कुठल्या जातीचा उमेदवार उभा राहिला तर इतर जाती समर्थन करत नाही, ही परिस्थिती आहे.

तसेच मी कुणावर आरोप करत नाही, ना पंकजा मुंडे ना देवेंद्र फडणवीस; पण ते कशाप्रकारे दिशाभूल करत आहेत ते सांगणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं आणि पंतप्रधानांकडे जाऊन इम्पेरीकल डेटा मागावा भुजबळ म्हणाले.

Advertisement