पिंपरी चिंचवड – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडानंतर शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे गट शक्तिप्रदर्शन करून सरकार स्थापनेच्या प्रयत्नात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्या बंडाने गेल्या चार दिवसांपासून राज्याचे राजकारण हे ढवळून निघत आहे.

मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी त्यांच्या समवेत 50-52 आमदार घेऊन थेट गुवाहाटी गाठल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याने मुख्यामंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची खुर्ची धोक्यात आली आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी (shivsena) आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदेंचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील शिवसैनिक ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे असा प्रश्न विचारला जातोय. म्हणून पिंपरी चिंचवडमधील शिवसैनिकांनी थेट शपथ घेतली आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहणार असा निर्धार केला.

ही शपथ घेण्यासाठी चिंचवडच्या चाफेकर चौकात शिवसैनिक एकवटले होते. यावेळी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नावाने जोरात घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा विजय झाला असला तरी शिवसेनेला (shivsena) मोठा धक्का बसला आहे.

आणि त्यानंतर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) त्यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षाचे जवळपास 50 हून अधिक आमदार सोबत घेऊन गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

आणि त्या दिवसापासूनच महाराष्ट्रात या राजकीय नाट्याला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. निकालानंतर एकनाथ शिंदे अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेत राजकीय भूकंप झाला.