मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery )यांच्या पत्नी यांच्या नावावर कोर्लई (Korlai) गावात १९ बंगले असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत यांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या वर टीकेचा बाण सोडला आहे. संजय राऊत यांना शिवसेनेकडून (Shivsena) मदत मिळत नसल्याचेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, १२ जुलै २०२१ रोजी मला, रश्मी ठाकरे यांचे पत्र माहिती अधिकारात मिळाले.

Advertisement

अन्वय नाईक यांची मालमत्ता, १९ घरे नावे केल्यास मी ऋणी राहील असा लिहिले असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले. हे मे २०२१ रोजीचे हे पत्र असल्याचेही किरीट सोमय्यांनी म्हंटले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे कुटुंबीयांचे नाव आल्यानंतर याबाबत मी भाष्य केले नव्हते. मात्र, राऊत यांनी अलिबाग बंगला खरेदी आणि पाटणकर यांनी खरेदी केलेली देवस्थान जमिनीचा मुद्दा बाहेर काढला. संजय राऊत यांना शिवसेना, ठाकरे कुटुंबीयांकडून कोणतीही मदत केली जात नाही.

त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या राऊत यांनी हम तो डूबेंगे ही ठाकरे तुम्हें भी ले डूबेंगे असा पवित्रा घेत मुख्यमंत्री ठाकरे यांना अडचणीत आणणाऱ्या प्रकरणांवर भाष्य केले असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.

Advertisement

कुठल्याही व्यक्तीने आरोप केले आणि त्याच्याकडे पुरावे नसतील तर मला याबाबत काही विचारू नका. संजय राऊत हे कुठलेही आरोप करत असून त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याचेही किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.