पुणे – शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना घरी जाऊन हात पाय तोडण्याची धमकी देण्यात आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी (shivsena) आणि पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त करत आंदोलन केले होते. तसेच काही कार्यकर्त्यानी त्यांना घरी जाऊन शिवीगाळ करत हात पाय तोडण्याची धमकी दिली.

दरम्यान, या प्रकरणी आता खेड पोलिसांत (Police) तब्बल 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, सचिन पडवळ, निलेश वाघमारे, कुमार ताजणे,गोरक्ष सुखाळे,

सुरेश चव्हण शंकर दाते, नवनाथ कोतवाल, काका कुलकर्णी, दत्ता भांबुरे, तुषार सांडभोर, बबनराव दौंडकर, चंद्रकांत भोर, बाजीराव बुचडे (सर्व रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आंबेगाव तालुक्याचे शिवसेना विभाग प्रमुख अंकुश शेवाळे यांनी फिर्याद दिली आहे. या अंतर्गत या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खेड येथील पुणे-नाशिक महामार्गावर त्यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालत जोडे मारले होते.

त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करून लोकांना अडवून ठेवले, त्यानंतर निषेध व्यक्त करत कार्यकर्ते हे आढळराव यांच्या (Shivajirao Adhalrao Patil) घरी जात त्यांना हात पाय तोडू अशी धमकी दिली होती.

आणि या धमकीवरुन खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

आढळराव पाटील यांनी देखील शिंदे यांच्या विजयाचे ट्विट केले….

बंड यशस्वी करत शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला होता, यातच आढळराव पाटील यांनी देखील शिंदे यांच्या विजयाचे ट्विट केले होते.

‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असा आशय आणि मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतचे छायाचित्र आढळरावांकडून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले होते.