औरंगाबाद : राज्यात (State) दोन दिवसांपासून कमी झालेली थंडी आता परत जोर पकडणार आहे. मराठवाड्यातील (Marathwada) काही भागात तापमान (Temperature) एक ते दोन अंश सेल्सियसने घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी (Meteorologist) व्यक्त केली असून, यामुळे पिकांवर रोग वाढू शकतो असे सांगण्यात येत आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागातील वरिष्ठ शास्त्रत्र कृष्णानंद होसळीकर (Krishnananda Hosalikar) यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात (State) मंगळवारी सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे 10 अंश एवढे नोंद झाली असून मुंबईदेखील (Mumbai) 17 अंश तापमान असण्याची चिन्हे आहेत.
राज्यामध्ये उत्तरेकडे थंडीचा प्रभाव वाढत आहे. तसेच विदर्भातही थंडीचा प्रभाव अधिक आहे. हे तापमान साधारण 19 फेब्रुवारीपर्यंत कमी राहणार असून तापमानात हळू हळू वाढ होईल असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
या हवामानामुळे काही ठिकाणी ज्वारीवर चिकटा किंवा खोड अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच पिकांवर कीड आणि इतर रोड पडणार नाहीत,
याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे (Dr. Kailash Dakhore) यांनी केले आहे.
सध्या चालूचे मराठवाड्यातील तापमानाची आकडेवारी
औरंगाबाद- किमान 13.6, कमाल- 31.4
परभणी- किमान 14.0, कमाल- 32.6
नांदेड- किमान 19.0, कमाल- 32.6
बीड- किमान- 13.0, कमाल 29.0
उस्मानाबाद- किमान- 14.0, कमाल- 32.3
हिंगोली- किमान – 18.0, कमाल- 31.0