पुणे – गेल्या काहीदिवसांपासून राज्यात पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. वातावरणात बदल झाला असून, राज्यातील काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यासह पावसाची (Rain) जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले आहे.

अश्यातच पुणे (Pune) शहरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं होतं. पुण्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती देखील यामुळे निर्माण झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, गेल्या आठवडय़ापासून राज्यात मुसळधार पाऊस होत असला, तरी दिवाळीच्या कालावधीत पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातून मोसमी वारे (Weather) वेगाने परतीचा प्रवास करत आहेत.

मात्र, मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात झपाटय़ाने (Weather) बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात गारवा वाढत आहे. विदर्भातही रात्री हलका गारवा जाणवत आहे. राज्यात पुढील आठवडाभर कोरडय़ा हवामानाची (Weather) स्थिती राहणार आहे.

त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीखालीच राहण्याचा अंदाज असून, दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

देशात १४८ दिवसांचे वास्तव्य करून २३ ऑक्टोबरला र्नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी परतले. त्यामुळे संपूर्ण राज्यातच सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे.

पावसाळी स्थिती असताना अगदी दोनच दिवसांपूर्वी राज्यात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान २० अंशांच्या पुढे होते. मध्य महाराष्ट्रात २१ ते २२ अंश, मराठवाडा आणि विदर्भात २१ ते २३ अंश,

तर मुंबई परिसरासह कोकण विभागात रात्रीचे किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. हे तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी अधिक होते. त्यात दोनच दिवसांत मोठा बदल झाला आहे.

रात्रीचे किमान तापमान कमी होत असून, दिवसाचे कमाल तापमान वाढत आहे. सध्या सर्वत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १२ ते १४ अंशांपर्यंत खाली आले आहे.

कोकणात १९ ते २२, मराठवाडय़ात १४ ते १७, तर विदर्भात १७ ते १८ अंशांपर्यंत रात्रीचे तापमान खाली आले आहे. राज्यातील निचांकी तापमान महाबळेश्वर येथे १२.२ अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.

किमान तापमान :

पुणे १४.४ (२१.८), जळगाव १५.०(२०.५), कोल्हापूर १८.६ (२२.६), नाशिक १४.२ (२१.२), सोलापूर १६.९ (२२.५), महाबळेश्वर १२.२ (१७.६), सांगली १६.५ (२१.६), सातारा १४.६ (२१.८), मुंबई २३.८ (२६.०), सांताक्रुझ २०.६ (२६.०), रत्नागिरी १९.२ (२४.६), औरंगाबाद १४.१ (२१.१), परभणी १७.० (२३.५), अमरावती १५.३ (१९.५), गोंदिया १७.८ (२०.०), नागपूर १७.० (२१.१), चंद्रपूर १८.० (२३.०)