Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

Weather Update : काळजी घ्या ! वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (5 ऑक्टोबर) रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार वापसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी परतीचा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जोर इतका होता की अवघ्या दोन तासांमध्ये शहरातील अनेक भाग जलमय झाले. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. या परिसरातील तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण पाण्याखाली गेला.

Advertisement

त्यामुळे वाहनतळावर लावण्यात अलेलल्या सुमारे 300 ते 400 दुचाकींचे नुकसान झाल्याचे समजते. पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी अतिमुसळधार पाऊस झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली.

पुणे शहरालगतच्या आकाशात 12 ते 15 किमी उंचीचे ढग तयार झाले होते. त्यामुळे काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरणं,

प्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला होता. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा अशी सूचनाही पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली होती.

Advertisement
Leave a comment