पुणे: राज्यात एकीकडे टाळेबंदी टप्प्याटप्प्यानं शिथील केली जात असताना पुण्यात मात्र खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून वीकएंड लाॅकडाऊन करण्यात आला आहे. त्याची सुरुवात झाली आहे. फक्त अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत.

फक्त पार्सल सेवा सुरू

पुणे महापालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर पूर्णतः बंद राहणार आहेत

तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

Advertisement

रात्री दहानंतर जमावबंदी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज याबाबत आदेश जारी केला आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे.

पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असणार आहे. रात्री दहा वाजल्यानंतर वैध कारणाशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही किंवा फिरताही येणार नाही.

काय रहाणार सुरु आणि बंद ?

  • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आठवड्याचे सर्व दिवस सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली राहतील.
  • – इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर शनिवार व रविवार बंद राहणार.
  • – रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट ग्राहकांसाठी शनिवार-रविवार बंद राहतील.
  • केवळ पार्सल सेवेची मुभा. रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल देता येईल.
  • – रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.
  • – वीकेंड वगळता अन्य दिवशी मॉल ५० टक्के ग्राहक क्षमतेने सुरू ठेवता येतील.

Advertisement