मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

दरम्यान, या राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच सामनाला (Samana) मुलाखत दिली आहे.

मात्र, सामनाला मुलाखत म्हणजे सर्वकाही ठरवून अशीच एक भावना सर्वसामान्यांची झाली आहे. गेला महिनाभर बंडखोर आमदारांबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी जी भावना व्यक्त केली तीच मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

दरम्यान, या मुलाखतीवरून भाजपाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh)यांनी ट्विट करत यावर आपले मत व्यक्त केलं आहे.

चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) म्हणाल्या.., “काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के” असं म्हणत निशाणा साधला आहे.

Advertisement

तसेच आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्या म्हणतात.., “मागील अडीच वर्षातल्या कर्तृत्वाच्या चार गोष्टी माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या असत्या तर लोकांनाही ऐकायला बऱ्या वाटल्या असत्या, पण तिथे वसूली शिवाय काहीच नव्हतं…”

असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार बोचरी टीका केली आहे. सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

Advertisement