पुणे : थेरगाव क्वीन (Thergaon Queen) नावाने इंस्टाग्राम (Instagram) चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी वाकड पोलिसांनी (Wakad Police) गुन्हा (Crime) दाखल करत तिला अटक (Arrest)  केली होती.

या १८ वर्षीय मुलीला पोलिसांनी समज देऊन सोडूनही दिले होते. पोलिसांच्या तपासात धक्कादायक (Shocking) माहिती उघड झाली आहे. या मुलीच्या थेरगाव क्वीन या नावाने ४० बनावट अकाउंट (40 Fake accounts) असल्याचे उघड झाले आहे.

या अल्पवयीन मुलीला अटक करून सोडून दिल्यानंतर पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओ मध्ये थेट पोलिसांनाच आव्हान देण्यात आले होते.

Advertisement

या मुलीच्या नावे जे अकाउंट आहे त्यावरून व्हिडीओ पोस्ट करत ‘मोठी हस्ती आहे आपण, तीनपाट थोडीच आहे. ढगात आहे ना आपण, खालुन किती पण दगडं मारु द्या आपल्यापर्यंत येत नाहीत भाऊ कुणाची दगडं’असे व्हिडिओमध्ये म्हंटले होते.

View this post on Instagram

Advertisement

A post shared by 👑Thergaon_queen_👑 (@thergaon_queen_09)

तसेच ‘अख्ख्या ब्रह्मांडाला शनि बोलून एकटा मी बास होतो, आमच्या बरोबर चालण्याचा बी त्रास होतो, नींद हराम करतो. असे बॅकग्राऊंड गाणेही टाकले होते.

Advertisement

यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा मुलीची चौकशी केली असता हा व्हिडीओ तिने टाकला नसल्याचे उघड झाले. आणि थेरगाव क्वीन या नावाने इंस्टाग्राम वर ४० बनावट अकाउंट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या बनावट अकाउंट विरोधात पोलिसांना तपास सुरु आहे. हे सर्व अकाउंट कोणाचे आहेत, ते अकाउंट कोण ऑपरेट करीत आहेत याची चौकशी पोलीस करत आहेत.

बनावट अकाऊंटवरती पोलिसांची नजर आहे. आक्षेपार्ह पोस्ट आढळ्यास सायबर गुन्ह्यांतंर्गत कारवाई केली जाईल. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीक यांनी अशी माहिती दिली आहे.

Advertisement