पुणे : तुम्ही आजपर्यंत चोरटे चोरी करण्यासाठी गाडीवर, मोठ्या गाडीत किंवा आणखी कशाने आलेले ऐकले असेल किंवा पहिले असेल. पण पुण्यात (Pune) चोर (Thief) चोरी करण्यासाठी चक्क विमानाने (Aircraft) दुसऱ्या राज्यातून पुणे शहरात (Pune City) येत असल्याची खळबळजनक घटना उघकीस आली आहे.

हे चोरटे उत्तरप्रदेशातून (Uttar Pradesh) चोरी करण्यासाठी पुणे शहरात येयचे. पोलिसांनी (Police) माहितीनुसार, शहरातील घरफोड्या रोखण्यासाठी पुणे शाखेचे पोलीस माहिती घेत होते.

त्यात त्यांना अतंरराज्यीय रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals) रेकी करून शहरात चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. यातील दोन चोरटे लोहगाव (Lohgaon) मध्ये थांबले असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली.

Advertisement

पोलिसांनी सापळा रचत २ चोरट्यांना अटक केली आहे. परवेज शेर मोहम्मद खान (Parvez Sher Mohammad Khan) (वय ४३) आणि तस्लिम अरिफ समशुल खान (Taslim Arif Samshul Khan) (वय २३) अशी अटक केलेल्या आरोपींची नवे आहेत.

हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या (Vishrantwadi Police Station) ​हद्दीत चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या चोरीमध्ये त्यांनी १३० ग्रॅम वजनाचे सोने चोरले होते.

हे चोर उत्तरप्रदेशमधून विमानाने चोरी करण्यासाठी पुण्यात येयचे आणि चोरलेला मुद्देमाल घेऊन त्यांचा एक साथीदार ट्रॅव्हल्स ने जायचा व बाकीचे पुन्हा विमानाने घरी जायचे. अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.

Advertisement