पुणे : कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Patients) झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. तसेच राज्य सरकारने (State goverment) नियमावली जाहीर केली आहे.

जमावबंदी, लग्न कार्यातील उपस्थिती, आणि इतर कार्यातील उपस्थिती बाबत प्रशासनाने निर्बंध घेतले आहेत. ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूची पसरण्याची क्षमता ही अगोदरच्या विषाणूपेक्षा अधिक आहे.

ओमिक्रॉन (Omicron) ची लक्षणे जरी सौम्य असली तरी त्याच्या पसरण्याचा वेग हा अधिक आहे. ओमिक्रॉन चा सामूहिक संसर्ग (Omicron Group Infection) सुरु झाल्यामुळे रुग्णामध्ये वाढ होत आहे.

Advertisement

प्रशासनाने मास्क अनिवार्य केले आहे. कोरोना संसर्ग (Corona Infection) झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात मास्क (Mask) न घातलेला व्यक्ती आला तर १५ मिनिटात संसर्ग होत असल्याचे उघड झाले आहे.

कापडाचा मास्क घातला असल्यास २० मिनिटे, सर्जिकल मास्क घातला असेल तर ३० मिनिटे आणि एन ९५ मास्क घातला असेल तर अडीच तासांनी कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो असा निष्कर्ष तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

दररोज वापरण्यात येणार मास्क हा तीन पदरी आणि जास्तीत जास्त पाच पदरी असावा असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. नागरिकांनी कोणता मास्क लावावा याबाबत विचार करावा.

Advertisement

मास्क वापरण्याबाबत नागरिकांनी हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून (Medical expert) करण्यात येत आहे. सध्याच्या संसर्गामध्ये सर्जिकल किंवा कापडी मास्कच्या तुलनेत एन ९५ मास्कच (N95 mask) सुरक्षा प्रदान करू शकतो.

असा निष्कर्ष पॅडेमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स (Padmic Response Task Force) या संस्थेच्या अभ्यासातून समोर आला आहे.

पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत एन ९५ मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement