पुणे : देशामध्ये भ्रष्टाचाराच्या (Corruption) प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामपंचायतीच्या (Gampanchayat) अधिकाऱ्यांपासून ते मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत लाच (Bribe) घेतली जाते. अशातच एक माहिती समोर आली आहे.

लाच घेण्याची प्रकरणे थांबवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (Bribery Prevention Department) वर्षभर छापेमारी सुरू असते. यावर्षी लाचलुचपत विभागाने भ्रष्टाचारप्रकरणी राज्यभरात तब्बल 726 गुन्हे दाखल केले आहेत.

यातील सर्वात जास्त म्हणजे 65 गुन्हे हे पुणे जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे जिल्हा (Pune District) हा भ्रष्टाचारात अव्वल ठरल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

औरंगाबादचा दुसरा आणि नाशिक जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात भ्रष्टाचाराचे 52 गुन्हे दाखल आहेत. तर, नाशिकमध्ये 39 गुन्हे दाखल आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Bribery Prevention Department) शासनाच्या 44 वेगवेगळ्या विभागांवर लक्ष ठेवले जाते. भ्रष्टाचार होऊ नये म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रयत्न सुरु असतात.

महसूल विभाग (Department of Revenue) आणि पोलिस दल (police force) सर्वाधिक भ्रष्ट असल्याचे दिसून येत आहे. चालू वर्षात राज्यभरात महसूल विभागाशी संबंधित 171 आणि पोलिस खात्याशी निगडित 166 गुन्हे दाखल झाले आहेत.

Advertisement