पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) महानगर पालिकेने तृतीयपंथीना (transgender) मुख्य प्रवाहात आणण्याच ठरवलंय, त्या दिशेने महानगर पालिकेने पाऊल टाकलं असून तृतीपंथीयांची सुरक्षा रक्षक म्हणून निवड केली आहे. ग्रीन मार्शल आणि महानगर पालिकेत तृतीयपंथीना (transgender) कंत्राट पद्धतीने नोकरीवर (employment) घेतलं आहे.

तर, भविष्यात देखील आणखी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचे महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटलंय, शहरात 5 हजारांपेक्षा अधिक तृतीपंथी आहेत.

दरम्यान, यावेळी सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झालेल्या तृतीपंथीनी (transgender) आपल्या भावना व्यक्त केल्यात आहेत. बहुतांश तृतीयपंथ्यांकडे सर्वसामान्य नागरिक वेगळ्या नजरेने पाहतात, ते भीक मागतात, सेक्स वर्कर अस हमखास म्हटलं जातं,

आम्हाला समाजाने योग्य मान, सन्मान दिला तर आम्ही देखील नोकरी करू शकतो’ असा विश्वास सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झालेल्या तृतीपंथीनी (transgender) व्यक्त केलाय.

तसेच, आमच्या इतर बांधवांनी देखील समाजात स्थान मिळवण्यासाठी उच्चशिक्षित व्हावं आणि नोकरी करावी अस आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.

आपल्या समाजात तृतीयपंथियांना (transgender) अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिकेनं त्यांना नोकरी देऊन मुख्य प्रवाहात आणायचं ठरवलंय, असं आयुक्तांनी सांगितलं.