पुणे : म्हाडा पेपरफुटीनंतर टीईटी (MahaTET) परीक्षेतही मोठा गैरप्रकार केल्याप्रकरणी तुकाराम सुपेंना (Tukaram Supe) अटक करण्यात आली आहे. पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber Police) याबाबत चौकशी सुरु आहे.

याच चौकशीत (Inquired) मोठी माहिती समोर येत आहे. पुणे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) आयुक्त तुकाराम सुपे (Commissioner Tukaram Supe) आणि त्याच्या मेव्हण्याच्या घरावर छापा टाकला.

पुणे पोलिसांनी तुकाराम सुपेच्या घरातून (Tukaram Supe’s house) २ कोटी आणि सोनंही सापडले असल्याची माहिती दिली आहे.

Advertisement

या प्रकरणी पुणे पोलिसांचा (Pune Police) अद्याप तपास सुरु आहे, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. महाटीईटी परीक्षेची जाहिरात (Exam advertisement) २०१९मध्ये देण्यात आली होती.

त्यानंतर याची परीक्षा जानेवारी २०२० मध्ये झाली होती. त्या शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

तुकाराम सुपेंनी त्यांच्या मित्रालाही लाखो रुपये दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तुकाराम सुपेंच्या घरात लाखो रुपये, सोने आणि काही एफडी केल्याची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

Advertisement