आंबील ओढयानजीकची अतिक्रमणे अजित पवार यांच्या सांगण्यावरून काढली जात आहेत. बिल्डर पवार यांचा निकवर्तीय आहे, असे आरोप झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झाले आहेत.

पुण्यातील आंबील ओढा परिसरातील घरांवरील कारवाईचा आणि माझा काय संबंध? मला का बदनाम केले जात आहे, अशी विचारणा करीत या कारवाईत हस्तक्षेप नसल्याचे राज्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी निर्णय

आंबील ओढ्यालगत सीमाभिंती उभारणीबाबतच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून येत्या शुक्रवारी निर्णय घेऊ, असेही पवार यांनी सांगितले.

Advertisement

पुणे शहरातील विविध प्रश्न, त्यावरील अंमलबजावणी अडथळे आणि उपाय यावर पवार यांच्या उपस्थितीतील मुंबईत बैठकीत चर्चा झाली.

तेव्हा बैठक सुरू होताच आंबील ओढ्याभोवती सीमाभिंत बांधण्याचा विषय आला. त्याचवेळी महापालिकेने गेल्या आठवड्यात केलेल्या येथील कारवाईचा संबंध नसल्याचे पवार यांनी जाहीर केले.

आयुक्तांशी पवारांची चर्चा

या कारवाईमागे पवार यांचा हात असल्याचा आरोप बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याची चर्चा होती.

Advertisement

त्यानंतर आंबील ओढयाभोवती सीमाभींत का बांधली जात नाही, याची विचारणा करीत पवार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली. त्यावर लोकप्रतिनिधींची भूमिका घेऊन घेतल्या आणि नगरविकास खात्याचे सचिव महेश पाठक यांच्याशी पवार यांनी सल्लामसलत केली.

पावसाळ्यात आंबील ओढ्याला पुराचा धोका असल्याने सीमाभिंत बांधण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव मंजूर झाला असला, तरी त्यातील नेमकी कार्यवाही करण्यासाठी पुण्याचे महापौर आणि महापालिकेतील अन्य पदाधिकान्यांशी चर्चा केली जाईल.

तेव्हा निर्णय करू.’’ असे ते म्हणाले. सीमाभिंत बांधण्याचा ठराव झाला, तरी महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याकडे आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, सचिन दोडगे, विरोधी पक्षनेत्या दीपाली घुमाळ, नगरसेवक आश्विनी कदम यांनी पवार यांचे लक्ष वेधले.

Advertisement