पिंपरी चिंचवड : तुम्ही परीक्षा देताना कॉपी (Copy) करण्याचे अनेक प्रकार ऐकले असतील. पण पिंपरी चिंचवड पोलीस भरती परीक्षेत (Police Recruitment Exam Copy) सिनेस्टाइल कॉपी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे एका पोलीस कॉन्स्टेबलनेच (Police Constable) कॉपी करण्यासाठी मदत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या कॉन्स्टेबलनेच मोबाईल वाला मास्क (Mobile in mask) तयार केला होता. हा मास्क तयार करून देऊन परीक्षार्थीला (Examiner) मदत करणाऱ्या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) अटक केली आहे.

Advertisement

राहुल गायकवाड (Rahul Gaikwad) ​असे आरोपीचे नाव आहे. तो औरंगाबादमध्ये पोलिस कॉन्स्टेबल (Aurangabad Police Constable) आहे.

​नितीन मिसाळ (Nitin Misal) हा परीक्षार्थी परीक्षेमध्ये बनवलेला मास्क घेऊन बसला होता. पोलिसांनी याला अगोदरच अटक केलेली आहे.

या प्रकरणात रामेश्वर शिंदे (Rameshwar Shinde) आणि गणेश शिंदे (Ganesh Shinde) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Advertisement

हे दोघे परीक्षार्थी नितीन मिसाळला उत्तरे सांगण्यासाठी मदत करणार होते. हिंजवडी ब्लू रिडज शाळेतील परीक्षा केंद्रावर तपासणीसमध्ये हा कॉपीचा नवीन प्रकार समोर आला आहे. हिंजवडी पोलिसांनचा याबाबत अधिक तपस सुरु आहे.

कसा बनवला मास्क ?

ही कॉपी करण्यासाठी N95 च्या मास्कचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये मोबाईलची बॉडी वगळता जी उपकरणे असतात, ती सर्व बसवण्यात आली होती.

Advertisement

मोबाईल डिव्हाईस, सिम कार्ड, बॅटरी, चार्जिंग कनेक्टर हे सर्व मास्कचा आतमध्ये बसवण्यात आले होते.