मुंबई: आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची जोरदार चर्चा आहे.यासाठी मनसे पूर्णपणे मैदानात उतरुन मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या ठिकाणी जोरदार तयारी करत आहे.

नाशिकमध्ये पक्षाचे प्रमुख राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे आणि इतर नेते मंडळींनी चार महिन्यांपूर्वीपासूनच तयारी चालू केली आहे. त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांच्या कामामध्ये बदल केले आहेत. राज ठाकरे यांनी औरंगाबादसह इतर शहरांचे काही दिवसांपूर्वीच दौरे आटपले आहेत.

त्यांनतर आता येत्या 2 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठक घेणार असून, या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.तसेच भाजप व मनसे युतीबाबतही राज ठाकरे बोलतील असा अंदाज आहे.

Advertisement

राज्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक आहे.

मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे येत्या काळातील निवडणूका अजून पुढे सरकण्याची शक्यता आहे. परंतु सर्व पक्षाकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी चालू आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे येथील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतः राज ठाकरे चर्चा करून त्यांना कानमंत्र देणार आहेत.

Advertisement