मुंबई – शिंदेगटाच्या बंडानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकार सत्तेत आलंय. नवं सरकार सत्तेत आल्यानंतर काल पहिलं अधिवेशन (Monsoon Session) होतं. त्यामुळे विरोधक जोरदार हल्लाबोल करणार हे निश्चित होतं. पण विरोधकांच्या या निषेधात भर पडली ती क्रिएटिव्ह घोषणाबाजीची.., या घोषणाबाजीमुळे विरोधकांचा आवाज मोजक्या अन् ठोस शब्दात सरकारसह जनतेपर्यंत पोहोचला असल्याचं पाहायला मिळत आहे.

30 जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा शपथविधी पार पडला होता. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे.

नुकतंच या नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम देखील पार पडला असून, शिंदे गटाकडून नऊ तर भाजपाच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, काल (दि. 17) विधिमंडळ अधिवेशन (Monsoon Session) होत. हे अधिवेशन किती वादळी ठरणार याची पहिली झलक अधिवेशनाआधी विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीतून दिसून आली.

विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी घोषणाबाजी केली. “50 खोके एकदम ओके!’ , “रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!’ अश्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, बाळासाहेब थोरात,

आदित्य ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात फलक झळकावत घोषणाबाजी केल्याची दिसून आले.

विशेष म्हणजे या घोषणाबाजीच्या गोंधळामध्ये काही क्षण आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि मुख्यमंत्री शिंदेही (Eknath Shinde) आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.

विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आपल्या सहकाऱ्यांसोबत अभिवादन केलं.

यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यासहीत समर्थक आमदार सभागृहात येत असतानाच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी केली.

आणि यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं होत.

दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी “हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच,’ अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती.

सोबतच आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे डरपोकांचं विधान आहे.

मुख्यमंत्री आणि खऱ्या मुख्यमंत्र्यांचा काही अंकुश राहिलेला नाही.आता तुम्ही मला सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत?” असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.