नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटियालामधील राजपुरा (Rajpura) येथे एका सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, “माझ्याबद्दल दोन गोष्टी समजून घ्या, जेव्हा मी बोलतो तेव्हा विचारपूर्वकच बोलतो मग तुम्हाला आवडो अथवा न आवडो मी या व्यासपीठावरून खोटी आश्वासने देणार नाही.

Advertisement

पंजाबला धोक्यापासून दूर ठेवायचे असेल तर सगळ्यांनी एकजुटीने चालायला हवे” असे यावेळी ते बोलले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले की “मी खोटी आश्वासने देणार नाही. जर कोणाला खोटी आश्वासने ऐकायची असतील तर त्यांनी पंतप्रधान मोदी, सुखबीर सिंग बादल आणि अरविंद केजरीवाल यांची भाषणे ऐकली पाहिजेत.

मला फक्त सत्य बोलायला शिकवले गेले आहे” असे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर “भारतात आज पंतप्रधान नसून एक असा राजा आहे, ज्याला वाटते की तो निर्णय घेत असताना लोकांनी शांत बसावे” असे बोलत हल्लाबोल केला आहे.