मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी कोर्लई (Korlai) गावात असणाऱ्या १९ बंगल्यांचा टॅक्स (Tax) भरल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ते बंगले कुठे आहेत असा प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता.

किरीट सोमय्यांनी घर नाही तर घरपट्टी का भरतात. याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायचंय. मुख्यमंत्री (CM) झाल्यानंतर घरपट्टी भरलीय. त्याचं ५.४२ लाख असे ग्रामपंचायतीने व्हॅल्युएशन दाखवलंय.

२००८ मध्ये व्हिजीट करून घरे बांधून झाली. तुम्ही एग्रीमेन्ट २०१४ मध्ये केले. मुख्यमंत्र्यांनी १२ नोव्हे २०२० ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरे चोरीला गेली का, असा सवाल त्यांनी केलाय.

Advertisement

शिवाय मी १२ महिन्यांपूर्वीच घरे चोरीला गेल्याची तक्रार केली. मग आता घरे नाहीत, अशी नाटकं का करता. ठाकरेंच्या पत्नीनं, रवींद्र वायकरांनी, घोस्ट घरं दाखवून कोट्यवधी लाटले असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

आता पुन्हा एकदा किरीट सोमय्यांनी या बंगल्यांबद्दल वक्तव्य केले आहे. १८ तारखेला किरीट सोमय्या स्वतः कोर्लई गावात जाणार आहेत आणि बंगल्यांबाबत पुरावे गोळा करणार आहेत.

तसेच ते बंगले कुठे चोरी झाले हेही किरीट सोमय्या पाहणार आहेत. त्यामुळे किरीट सोमय्यांना कोर्लई गावात जाऊन काय सध्या होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement