मुंबई : देशात सध्या ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यावरूनच भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना खोचक टोला लगावला आहे.

५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीची (5 State Assembly Elections) प्रत्येक पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. सर्व पक्षाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

शिवसेनेने देखील गोवा आणि उत्तर प्रदेश मध्ये (Uttar Pradesh) काही ठिकाणी उमेदवार उभे करून आपली ताकद पणाला लावली आहे.

Advertisement

शिवसेना नेते संजय राऊत सध्या गोवा (GOA) विधानसभा निवडणुकीसाठी गोव्याला गेले आहेत. अशातच भाजपकडून त्यांना निवडणूक जिंकण्याचे आव्हान देण्यात येत आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. ते म्हणले, “माझा तुम्हाला प्रश्न आहे. ४० वर्षांपासून तुम्ही शिवसेनेत आहात. पूर्ण देशभरात फिरून तुम्ही निवडणुकीचं काम करत आहात.

मला एक सांगा, आजपर्यंत तुम्ही कोणती निवडणूक लढवली? कोणत्या ठिकाणी असे झाले की तुम्ही जाऊन प्रचार केला आणि तो उमेदवार निवडून आला.

Advertisement

तुम्ही जिथे जिथे गेलात, तिथे उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले”, असे म्हणत संजय राऊत यांना कंबोज यांनी टोला लगावला आहे.

पुढे बोलताना मोहित कंबोज म्हणाले की, मी तुम्हाला आव्हान देतो राऊतसाहेब. २०२२च्या महानगरपालिका निवडणुकीत तुमची चाणक्यनीती दाखवून द्या. मुंबईतला तुम्हाला वाटेल तो सर्वात सुरक्षित वॉर्ड घ्या आणि तिथून निवडणूक जिंकून दाखवा.

तेव्हा आम्ही मानू की तुम्ही किती मोठे चाणक्य आहात. २०२२ आणि २०२४-२९ च्या गोष्टी तुम्ही करता. उत्तर प्रदेशपासून गोवा आणि कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतच्या गप्पा तुम्ही करता.

Advertisement

पण त्याआधी २०२२मध्ये संजय राऊत निवडणूक जिंकू शकतात का, हे लोकांना सिद्ध करून दाखवा”, असे म्हणत भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.