मुंबई: अभिनेता हृतिक रोशन नुकताच कोरोनातून बरा झाला आहे. शुक्रवारी हृतिक हा मुंबईतील एका प्रसिद्ध जॅपनीज रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला होता. यावेळी हृतिकसोबत असणारी तरुणी कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी चाहते धरपड करत आहेत.

हृतिक आणि त्यासोबत असलेल्या मुलीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अखेर ही मुलगी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. काहींना यावेळी हृतिकची चुलत बहीण पाशमिना रोशनही दिसली.

सदर व्हिडीओमध्ये हृतिकने तरुणीचा हात त्याच्या हातात धरला असे दिसत आहे. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. हृतिकच्या एक्स वाईफ सुजैनला कोरोनाची लागण झाल्यानंतर हृतिकही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे तो बाहेर जास्त प्रमाणात दिसून येत नव्हता.

Advertisement

त्याचबरोबर हृतिकसोबत हॉटेल बाहेर दिसलेली मुलगी ही साबा आझाद असल्याचाही दावा काही जण करत आहेत. साबा आझाद ही एक तरुण संगीतकार आहे. दरम्यान, खरंच ही मुलगी साबा आझाद होती का? का दुसरी कोण होती . हे अजून कोणालाही अचूक समजले नाही. पण मुलीसोबत हृतिक दिसल्यानं आता तो एका नव्या मुलीला डेट करतोय की काय, असाही सवाल काही चाहत्यांनी विचारला आहे.