इस्त्रायलमधील सॉफ्टवेअर एजन्सीने आमचं सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच विकत असल्याचे स्पष्ट केले आहे. खासगी लोकांना नाही.

जर खासगी लोकांना विकण्यात आले नाही तर केंद्रसरकारच्या कुठल्या एजन्सीने देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश, उद्योगपती यांचे फोन हॅक करून पाळत ठेवली? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

पेगॅससच्या माध्यमातून पाळत

भारतातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश आणि उद्योगपती यांच्यावर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्यात आल्याची बाब गंभीर आहे.

Advertisement

याप्रकरणाची चौकशी करून जो जबाबदार असेल त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी मलिक यांनी केली आहे.

तीनशे जणांची केंद्राकडून जासुसी

तीनशे भारतीयांची केंद्र सरकारनेच जासूसी केल्याचा आरोप आहे. यात 40 पेक्षा जास्त पत्रकार आहेत.

न्यायाधीश, उद्योगपती यांचीही हेरगिरी केल्याचं वृत्त एका न्यूज पोर्टलनं दिलेलं आहे. याच मुद्यावर आज संसदेत गदारोळ झाला.

Advertisement

केंद्र सरकारच्या माहितीसाठी हे करण्यात आले असेल तर कुठल्या अधिका-याने किंवा एजन्सीने फोन हॅक करून पाळत ठेवली याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे असे ते म्हणाले.

राहुल गांधींचा आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगॅसस सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.

तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्वीट राहुल यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मीडियाने केला आहे.

Advertisement

इस्रायलची एक कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर पेगॅससचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये तीनशेहून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे.

पेगॅसस काम कसं करतं ?

ज्याच्या फोनला हॅक करायचं असतं त्याच्यात पेगॅसस इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात.

Advertisement

त्यातला एक मार्ग असाही आहे, की ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे, त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. त्या लिंकवर यूजरने क्लिक केले, की पेगॅसस आपोआप इन्स्टॉल होतं.

 

Advertisement