Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

महत्त्वाची बैठक आपण का टाळू ? महापाैर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालैल्या बैठकीला महापाैर मुरलीधरम मोहोळ यांना निमंत्रण होते, की नाही, यावरून वाद अजूनही सुरू आहे. आता महाैपारांनीच त्याबाबत स्पष्टीकरण देऊन आपण बैठक का टाळू, असा उलट सवाल केला आहे.

मला डावललं, तरी स्वागतच

आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकांना माझी उपस्थिती होती. पुण्यातील दर शुक्रवारी होणाऱ्या अजित पवार यांच्या सर्व बैठकांना हजेरी लावून समन्वय साधला आहे.

असं असताना पुणे शहरासाठी महत्वाची असणारी बैठक आपण का टाळू? तरीही आपल्याला डावलून का होईना शहराच्या विकासासंदर्भात बैठक होते, याचं आपण स्वागतच केलं असल्याचं ते म्हणाले आहेत.

मी खोटं बोलत असल्याचा दावा हास्यास्पद

“मंत्रालय बैठक प्रकरणी महापौर खोटे बोलत आहेत, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा आरोप हास्यास्पद आहे. काळ सोकावू नये, म्हणून हा पुणेकरांशी ‘संवादप्रपंच’; कारण आमची बांधीलकी पुणेकरांशी आहे, ना की पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्यांशी” अशी टिप्पणी मोहोळ यांनी केली आहे.

महापौरांचे अनेक प्रश्न

“या वेळी मी मुठा या मुळशी तालुक्यातील गावी माझ्या आईवडीलांसमवेत होतो. बैठकीला आपल्याला निमंत्रण नाही, याची खात्री झाल्यावरच मी मुठा गावाला जाण्याचे नियोजन केलं. ज्या ठिकाणाहून फोनवर बोलताना व्यवस्थित रेंज येत नाही.

तिथून अचानकपणे ऑनलाईन सहभागी व्हायचं? बरं बैठकीचा अजेंडा काय? कोणकोणते विषय आहेत? त्या विषयाची सर्वांगीण आणि सद्यस्थितीची माहिती कधी आणि किती वेळात घ्यायची?

बैठकीला कोणत्या विषयानुसार काय भूमिका असावी? याबाबत विचारायला करायला किमान वेळ तरी मिळू नये?” असे सवाल मोहोळ यांनी केले.

 

Leave a comment