(Health tips) Breastfeeding: स्तनपानाचे फायदे: मूल (baby)आणि आई (mother)यांच्यातील नाते हे इतर सर्व नातेसंबंधांपेक्षा श्रेष्ठ आहे. बाळाच्या जन्मानंतर काही काळ त्यांना फक्त आईचे दूध दिले जाते. सुरुवातीचे काही महिने त्यांना दुसरे काहीही देऊ नये असा सल्ला डॉक्टर देतात. आईचे दूध मुलासाठी वरदानापेक्षा कमी नाही. आईचे दूध मुलांसाठी का महत्त्वाचे आहे आणि स्तनपान न केल्यास बाळाच्या वाढीवर किती परिणाम होतो, त्याबद्दल जाणून घेऊया.

स्तनपानाचे फायदे: (benefits of breastfeeding)

स्तनपान बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असते. आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. याशिवाय स्तनपानामुळे बालकांची प्रतिकारशक्ती वाढते. गर्भाशयातील वातावरण मुलासाठी अतिशय सुरक्षित असते, परंतु जन्मानंतर आईच्या दुधामुळे त्याची प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे मूल बाहेरील वातावरणात असलेल्या विषाणू आणि जीवाणूंशी लढू शकते.

सुरक्षिततेची भावना देते: (feels secured)

गर्भातून बाहेर आल्यानंतर मुलाला त्याच्या आईसोबत सर्वात सुरक्षित वाटते. या घटनेत स्तनपानाची भूमिका महत्त्वाची आहे. कारण आईच्या कुशीत स्तनपान करताना बाळाला सर्वात जास्त सुरक्षित वाटतं. स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतो. या कारणामुळे आईची मुलाशी सर्वात जास्त ओढ असते.

किती वेळ स्तनपान करावे 

लहान मुलांना किमान सहा महिने स्तनपान दिले पाहिजे. डॉक्टरही बाळाला किमान (atleast 6 months) सहा महिने फक्त आईचे दूध पाजण्याची शिफारस करतात.