ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

उरवडे आगीत पतीसमोरच पत्नीचा जळून झाला मृत्यू; मुलांना आता काय देणार उत्तर?

सोमवार दिनांक ७ जून रोजी पुण्याजवळील उरवडे गावातील सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आग लागली आणि १८ जणांचा त्या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला. आगीचे स्वरूप एवढे मोठे होते की १८ जणांचा जागीच धक्कादायक मृत्यू झाला.

सॅनिटायझर कंपनीला लागलेल्या आगीत पाटसमोरच पत्नीचा जाळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पती पत्नीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता पण आगीच्या भडक्यामुळे त्याला पत्नीला बाहेर काढता आले नाही. बबन आणि मंगल मरगळे दोघेही एकाच कंपनीत कामाला होते.

हे दोघेही कंपनीत पॅकेजिंग विभागात कामाला होते. मंगल यांनी एक महिन्यांची सुट्टी घेतली होती. मंगल यांच्या कंपनीतील पहिला दिवसच त्यांच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला. कंपनीला आग लागल्यानंतर बबन बाहेर पडले परंतु त्यांच्या पत्नीला मात्र बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

आगीमध्ये होरपळून मंगल यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. कुटुंबाच्या कामात पतीला हातभार लावता येईल या उद्देशाने मंगल या कंपनीत कामाला येत होत्या.

मंगल यांची कुटुंबाच्या भल्यासाठी कायमच धडपड असायची. आई मंगल या कामावर जात होत्या. कामावरचा पहिलाच दिवस असल्यामुळे संध्याकाळी आई परत येईल या आशेने मुलें रस्त्याकडे चेहरा करून बसली होती. पण त्यांच्या पतीला आता मुलांना काय सांगायचे हा प्रश्न पडला आहे.

You might also like
2 li