पुण्यासारख्या पुरोगामी विचाराच्या शहरांत अंधश्रद्धा, रुढी, परंपरा इतक्या खोलवर रुतल्या आहेत, की त्यातून उद्योजकासारखी माणसंही त्याच्या आहारी जातात आणि कथित गुरुजींचे ऐकून तिचा कसा शारीरिक व मानसिक छळ करतात, हे अनुभवायला मिळालं.

कथित अध्यात्मिक गुरूला अटक

पत्नीला सिगारेटचे चटके देत शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी उद्योजक पती व कुटुंबातील तिघांसह आठ जणांवर चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीशी संबंधित अध्यात्मिक गुरुंना चतुःश्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली.

आठ जणांवर गुन्हा

रघुनाथ राजाराम येमुल (वय ४८, रा. धवलगिरी अपार्टमेंट, आयवररी इस्टेट, बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या गुरुजींचे नाव आहे.

Advertisement

या प्रकरणी २७ वर्षीय पीडित विवाहितेने फिर्याद दिली असून, तिच्या पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी सात जणांना अटकपूर्व जामीन झाला असून, पती व अन्य एक आरोपी फरार आहे.

विवाहितेला संबोधले पांढ-या पायाची

रघुनाथ येमुल यांनी फिर्यादीच्या पतीला फिर्यादी पांढऱ्या पायगुणाची असून, तिची जन्मवेळ चुकीची असल्याने ग्रहमान दूषित झाले आहे, ती तुझी बायको राहिली तर तू आमदार व मंत्री होणार नाही, त्यामुळे तिला सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे, असे सांगितले व तिच्यावरून लिंबू उतरवण्यासाठी दिले.

संसार मोडण्यासाठी अनिष्ट रुढी व अघोरी कृत्याचा वापर झाल्याचे फिर्यादीने पुरवणी जबाबात नमूद केल्यानंतर येमुल याला अटक करण्यात आली.

Advertisement