संसदेच्या स्थायी समितीची बैठक ठरलेली नसतानाही खासदार संजय राऊत मुंबईहून दिल्लीला गेले. त्यांचा दाैरा गोपनीय होता.

त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणासाठी राऊत दिल्लीला गेले अशा चर्चा सध्या सुरू आहेत. या दाै-यात त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याने राज्यात राजकीय समीकरणे बदलणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

भाजप नेत्यांच्या गाठीभेटी झाल्याचे मान्य

राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, इंधन दरवाढ अशा अनेक मुद्द्यांवर वातावरण पेटून उठलं आहे. अशाच महाराष्ट्रात आगामी निवडणुकांसाठी राजकीय घडामोडी वेगाने वाढताना दिसत आहेत.

Advertisement

राऊत यांनी दिल्ली गाठल्याने चर्चेला वेगळंच वळण लागलं आहे. भाजपच्या नेत्यांशी भेटगाठी झाल्या का, असा प्रश्न विचारला असता राऊत यांनी होकार दिला आहे.

महाराष्ट्राबाबत लवकरच निर्णय

दरम्यान, दिल्लीमध्ये संजय राऊत हे भाजपच्या कोणत्या नेत्यांना भेटले, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही; पण तरीदेखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महाराष्ट्राबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय होईल अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेबद्दलही विलंब झाला आहे, अशी चर्चादेखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिवसेना भाजपसोबत जाणार?

येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात काय निर्णय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर अनेक घटनांना वेग आला होता.

Advertisement

या भेटीचा तपशील अद्यापही समोर आलेल नाही. त्यानंतर आता संजय राऊत यांची भेट राजकीय चर्चेचा विषय झाली आहे. इतकंच नाही तर या भेटीमुळे शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाणार का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

 

Advertisement