वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या धर्तीवर फळ पिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शरद पवार यांच्या सूचनेवर कार्यवाही

खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार फळ पिकांबाबत विचार-विनिमय करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर झालेल्या बैठकीत विचार मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या सर्व सूचना अंमलात आणण्याची ग्वाही दिली.

Advertisement

बैठकीला कृषिमंत्री दादा भुसे, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, पोक्राच्या प्रकल्प संचालक इंद्रा मालो.

सहाद्री फार्मर्स प्रोड्युसर्सचे विलास शिंदे आदींसह राज्यातील फलोत्पादन, कृषी निर्यात क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येक जिल्ह्यांत स्वतंत्र फळ पिकाचा विकास

महाराष्ट्रातील फलोत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, राज्यातील फलोत्पादनवाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करुन त्याचं ब्रॅन्डिंग करणे आदी सूचना शरद पवार यांनी केल्या.

Advertisement

या सूचनांवर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी आज दिली.

फलोत्पादन वाढ आणि निर्यातीला संधी

या वेळी राज्याच्या कृषी, फलोत्पादन विभागातर्फे राज्यातील फलोत्पादनाबाबत सादरीकरण करण्यात आले.या वेळी शरद पवार म्हणाले, की महाराष्ट्रात फलोत्पादनवाढीला व फळनिर्यातीला प्रचंड संधी आहे.

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचं वैशिष्ट्यं म्हणून विकसित करता येईल. फलोत्पादन व उत्पन्न वाढीसाठी जागतिक स्तरावरील उत्कृष्ट वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी.

Advertisement

फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ब्रॅन्डिंग निर्माण करण्यासाठी, फळप्रक्रिया उद्योग उभारण्यास शासनाने मदत करावी. फळनिर्यातदारांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणा कार्यक्षम करावी.

 

Advertisement