मुंबई : कर्नाटक (Karnataka) राज्यात शाळेत (School)  हिजाब (Hijab) न परिधान करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने (Karnataka Goverment) घेतला आहे. त्यावरून अनेक ठिकाणी वातावरण तबल्याचे पाहायला मिळाले. नवाब मलिक (Nawab Malik)  यांनी या सर्व प्रकरणावरून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

हिजाब प्रकरणावरून अनेक स्थरातून टीका होत आहे. कर्नाटक मधून एका मुलीचा नारे देताना चा व्हिडीओ (Video) व्हायरल झाला होता. या मुलीला अनेक ठिकाणहून समर्थन मिळताना दिसत आहे.

हिजाब घालवरूनच वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारला ३ दिवस शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

Advertisement

या सर्व प्रकारावरून राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट (Twit) करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रश्न विचारला आहे. या प्रकरणाचे राजकारणात चांगलाच वाद पेटल्याचे दिसत आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, देशात कोणी काय खायचे? आणि काय परिधान करायचे हे भाजप आणि संघपरिवार ठरवणार का असा सवाल त्यांनी केला आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, देशातील नागरिकांची मूलभूत अधिकारांची सरळसरळ पायमल्ली केली जात आहे. त्यांच्या अधिकारावर भाजप आणि संघपरिवाराकडून गदा आणली जात आहे.

Advertisement

मुस्लिम मुली हायस्कूल आणि महाविद्यालयात जाऊन शिकत आहेत ही समस्या आहे का? मुली शिकवा या घोषणेचं काय झाले? अशा प्रकारचे ट्विट करत नवाब मलिक यांनी मोदींना प्रश्न विचारला आहे.