जात पंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याच्या विरोधात पोलिसांत (police) तक्रार दिली, म्हणून एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

तिच्यासह कुटुंबीयांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी एका ३४ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हे आहेत आरोपी

रुपेश प्रेम कुंभार (वय ४०), निखील सुनील कुंभार (वय २९), प्रेम कुंभार (वय ६०) आणि तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेला तसेच या महिलेचे पती, बहिण आणि आईला जिवे मारण्याची धमकीही दिली.

गुन्हा सासवड पोलिसांकडे वर्ग

याबाबत भारती विद्यापीठचे सहायक पोलिस निरीक्षक तानाजी भोगम म्हणाले, ‘जात पंचायतीने बहिष्कृत केल्याप्रकरणी एका महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तो गुन्हा सासवड पोलिस ठाण्यात वर्ग झाला आहे. या गुन्ह्यात नाव असल्यामुळे आरोपींनी या महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.’