ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

जिल्हा परिषदेत काम आणि फाईलींचे मॅपिंग

लोकांना आपण दिलेल्या कामाचे काय झाले, आपली फाईल कुठे अडकली आहे, यासाठी राज्यातील वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी फाईल ट्रेकिंग सिस्टीम सुरू केली आहे. पुण्यात आता अधिकारी, कर्मचा-यांचे काम आणि फाईलींचेही मॅिपंग करण्यात येणार आहे.

दर्जा वाढविण्यासाठी निर्णय

जिल्हा परिषदेच्या कामाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि कामात सुसूत्रता आणण्यासाठी आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे त्यांच्याकडे असणारे काम आणि फाईलींचे आता मॅपिंग होणार आहे. फायलींच्या प्रवासाची प्रत्येक टप्प्यावर नोंद ठेवण्यात येणार आहे.

प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील फायलीची निर्गती किती दिवसांत आणि कोणत्या टप्प्यावर केली याचीही ऑनलाईन नोंद होणार आहे.

या कार्यपद्धतीमुळे फायलींचा प्रवास जलद गतीने होणार असून प्रलंबित कामाबद्दल संबंधितांना जबाबदार धरले जाणार असून येत्या महिनाभराच्या अवधीमध्ये ही प्रणाली जिल्हा परिषदेत कार्यान्वित केली जाणार आहे.

प्रशिक्षण सुरू

अनेक कर्मचाऱ्यांना आपण नेमके काय काम करतो, त्याची कार्यपद्धती, त्याचे नियम निकष तसेच अधिकार याबद्दलची कोणतीही कल्पना नसते. जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी यापूर्वी या पद्धतीने काम झाले आहे.

त्याच पद्धतीने फायलीं पुढे पाठवत होते; मात्र आता प्रत्येक कर्मचा-याला तो करत असलेले काम हे कोणत्या निकष आणि नियमात आहे, याबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रामार्फत सध्या मार्गदर्शन केले जात आहे. जिल्हा परिषदेमध्ये गेल्या शनिवार आणि रविवारी दोन दिवस याबद्दल विशेष मोहीम घेण्यात आली.

कामाच्या पद्धतीत होणार आमूलाग्र बदल

कामाच्या फायली प्रलंबित ठेवणे किंवा त्याचा वेळेवर निपटारा न झाल्याने अनेक प्रशासकीय प्रश्न निर्माण होतात. कर्मचाऱ्यांना आपण काय काम करतो, याची नीटशी माहिती नसते.

प्रथा-परंपरा कार्यपद्धती तसेच पूर्वी या पद्धतीने काम झाले म्हणून तसेच काम सुरू ठेवण्याचा पायंडा प्रशासनात दिसून येतो; मात्र आता मॅपिंग सिस्टीम बरोबरच प्रत्येकाला कामाची जबाबदारी त्याच्या कामाचे नियम याबद्दलची परिपूर्ण माहिती संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे असेल.

त्याच पद्धतीने निर्धारित वेळेत फायलींचा प्रवास पूर्ण करण्याची जबाबदारीदेखील निश्चित होणार आहे.

 

You might also like
2 li