पुणे: भारतीय मजदूर संघाच्या राज्य शाखेचे २३ वे त्रेवार्षिक अधिवेशन पुण्यात आभासी पद्धतीने सुरू आहे. आज पदाधिका-यांच्या निवडी होणार आहेत.
दरम्यान, रोजगार, वेतनवाढ व सामाजिक सुरक्षा या त्रिसूत्रीवर काम करण्याची गरज आहे, असे मत भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस बिनयकुमार सिन्हा यांनी व्यक्त केले.
कामगारांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहायला हवे
या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष विजयराव मोगल होते. क्षेत्र संघटन मंत्री सी. व्ही. राजेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोरोनामुळे जगभरात कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला. भारतही त्याला अपवाद नाही, असे निदर्शनास आणून ते म्हणाले, की कामगारांच्या समस्यांकडे आता कोरोनानंतरच्या काळात अधिक गंभीरपणे पाहायला हवे. स्थलांतरित कामगारांचे प्रश्न नव्याने पुढे आले आहेत. त्यावर विचार व्हायला हवा.
नव्या तंत्राने अधिवेशन
भारतीय मजदूर संघ ही सगळी आव्हाने पेलून काम करेल, असा विश्वास सिन्हा यांनी व्यक्त केला. सरचिटणीस रवींद्र देशपांडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महामारीच्या काळात एकत्रीकरण करणे अवघड असूनही नव्या तंत्राने नियम पाळून अधिवेशन घेतल्याने ते संस्मरणीय ठरणार आहे