पिंपरी : येथील पोपट तुकाराम गायकवाड (वय ४५, हवेली ) या व्यक्तीचा खून (Murder) झाल्याप्रकरणी बाबासाहेब बबन काटे (वय-३२, रा. भवरापूर, ता. हवेली) या व्यक्तीची संशयीत म्हणून सलग तीन दिवस पोलिसांनी (Police) चौकशी केली. यामुळे या व्यक्तीने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार घडला आहे.

गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून या व्यक्तीचा तपास चालू होता. परंतु खुनाच्या प्रकरणात पोलीस आपल्याला अडकवतील या भीतीने बाबासाहेब काटे यांनी विष (poison) पिऊन आत्महत्या आत्महत्या केली आहे.

या व्यक्तीने आत्महत्या पूर्वी चिट्टी लिहून ठेवली होती. ज्यामध्ये पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीमुळे खुनाचा आरोप आपल्यावर येईल अशी भीती वाटल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Advertisement

बाबासाहेब काटे यांची २० जणांची लोणी काळभोर, लोणीकंद पोलीसांसह (Lonikand Police) क्राईम ब्रँच युनिट (Crime Branch Unit) ६ च्या पथकाने सलग तीन दिवस चौकशी केली होती.

माझ्याकडे पैसे नाहीत व मी मेल्यानंतर माझ्या मुलीचे व बायकोचे कसे होणार? माझ्यावर कोणताही दबाव नाही. घरच्यांना कोणीही त्रास देऊ नका.

मला जेवढी माहिती होती तेवढी मी पोलिसांना दिली आहे. मला मरायचे नव्हते पण माझे नाव आले त्यामुळे मागील तीन दिवसांपासून मी जेवलो नाही किंवा मला झोपही लागली नाही.

Advertisement

मला माझ्या मुलीला शिकवायचे होते. परंतु मला खूप टेंशन (Tension) आल्यामुळे मी औषध घेत आहे. तसेच पोलिसांना जबाबदार ठरवत नसल्याचेही चिट्ठीत नमूद करण्यात आले आहे.