जागतिक गर्भनिरोधक दिनानिमित्त मॅनकाइण्ड फार्माच्या अधिपत्याखालील रेग्युलर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह अनवॉन्टेड-२१ डेजने मराठी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा व्हिडिओ संदेश सादर केला आहे.

दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक गर्भनिरोधक दिनाच्या निमित्ताने जागरूकतेचा संदेश दिला जातो. तसेच सर्व जोडपी आणि व्यक्तींमध्ये मुक्तपणे व जबाबदारीने त्यांच्या मुलांची संख्या व त्यामधील अंतराबाबत निर्णय घेण्याच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण केली जाते.

या व्हिडिओ संदेशामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एका जोडप्याच्या त्यांच्या बाळाबाबत नियोजन करण्याच्या वैयक्तिक निवडीबाबत सांगत आहे. अभिनेत्री सांगते, ज्याप्रमाणे व्यक्ती त्यांचा आहार, कपडे, व्यावसायिक जीवन व मित्र यांची स्वत:ची आवड व पसंतीनुसार निवड करतात, अगदी त्याप्रमाणेच त्यांना कुटुंब नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

Advertisement

या व्हिडिओ संदेशामध्ये गर्भधारणा ही ‘नकळतपणे’ नाही तर स्वइच्छेनुसार’ झाली पाहिजे. सर्व सोशल मीडिया व्यासपीठांवर हा व्हिडिओ संदेश दाखवला जात आहे.

‘अनवॉन्टेड – २१ डेज टॅब’ ही ओरल गर्भनिरोधक गोळी आहे. ‘अनवॉन्टेड – २१ डेज टॅब’ ही गर्भधारणा उशिराने करण्याची किंवा पुढील बाळामध्ये अंतर ठेवण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी सुलभ, गुणकारी व सुरक्षित प्रतिवर्ती गर्भनिरोधक गोळी आहे.

Advertisement