Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

चिंता वाढवणारी बातमी ! दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा जास्त

लसीकरणानं देखील हळूहळू वेग घेतला असल्याने व्यापक प्रमाणावर नागरिकांना लसीकृत केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे करोना रुग्णांची संख्या जरी कमी होताना दिसत असली, तरी दुसरीकडे पुण्यात दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांमध्ये करोनाची बाधा होण्याचं प्रमाण काहीसं वाढलं आहे.

त्यामुळे प्रशासनासाठी ही चिंतेची बाब ठरली असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

पुण्यात दुसऱ्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याचं प्रमाण हे पहिल्या डोसनंतर करोनाची बाधा होण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं “पुणे शहरात करोनाबाधित होण्याचा दर २.१ टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये २.२ टक्के आणि पुणे ग्रामीणमध्ये ३.८ टक्के आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यापेक्षा परिस्थिती सुधारली आहे. मृत्यूदर देखील काहीसा कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात ५ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. लसीकरणात ५ टक्के वाढ झाली आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर किती लोकांना बाधा होतेय, याचा सर्वे केल्यानंतर त्यात ०.१९ टक्के लोकांना बाधा होत असल्याचं लक्षात आलं आणि दुसरा डोस घेतल्यानंतर हे प्रमाण ०.२५ टक्के इतकं आहे”,

असं अजित पवार म्हणाले. पुण्यात गेल्या १५ दिवसांत रोजच्या रुग्णांमध्ये ३० टक्के आणि अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये १९ टक्के घट दिसून आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Advertisement
Leave a comment