मुंबई : आरोग्यमंत्री (Minister of Health) राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शालेय मुली व महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याची माहिती दिली आहे. तसेच ही बाब अतिशय चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, एनएचएम (NHM) आणि टाटा मेमोरियल सेंटरच्या (Tata Memorial Center) स्टेट लेव्हल यूथ टोबॅको सर्व्हेचे, महाराष्ट्र फॅक्ट शीटचे प्रकाशन टोपे यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

यावेळी राजेश टोपे म्हणाले की, शालेय विद्यार्थी विशेषतः महिला आणि मुलींमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

Advertisement

तंबाखू सेवन आरोग्याला हानिकारक आहे, याबाबत लोकांत जाणिव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तंबाखू सेवन आरोग्याला धोकादायक आहे, याची जाणीव असूनही तंबाखू सेवन केले जाते.

तंबाखूजन्य उत्पादनाची मागणी कमी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग , पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन आणि शालेय शिक्षण विभागाने एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे.

या कार्यक्रमाला टोपे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते तर यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास,(Dr. Pradeep Vyas) सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे महासंचालक डॉ. एल. स्वस्तिचरण, डॉ. राजेश दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement